Connect with us

बेस्ट डील्स

अँड्रॉइड मोबाईल साठी बेस्ट अँटिव्हायरस – Best antivirus for android

Published

on

Best antivirus for android
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

आजचा काळ हा स्मार्टफोनचा काळ आहे. कम्प्युटर पेक्षा जास्त वापर आज आपण मोबाईलचा करतो. त्यामुळे मोबाईल मध्ये सुद्धा व्हायरसचा धोका असू शकतो. आपल्याला कळत नाही की कोणत्या एप्लीकेशन आपल्यासाठी चांगलं आहे आणि कोणतं नाही. आपण एखादी ॲप्स डाऊनलोड केले की आपला मोबाईल लगेच हँग किंवा स्लो चालायला लागतो, त्यामुळे आपल्या मोबाइलमध्ये अँटिव्हायरस असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही नेटचा जास्त युज करत असाल तर तुम्हाला अँटिव्हायरस वापरण्याची गरज आहे.

 जर तुम्हाला कळत नसेल कोणतं अँटीव्हायरस मोबाईल मध्ये वापरायचं आहे. आज आम्ही तुमची यामध्ये मदत करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला काही फ्री आणि पेड अँटिव्हायरस बद्दल सांगणार आहोत. जर तुमचा मोबाईलचाजर तुमच्या मोबाईलचा वापर कमी असेल तर तुम्ही फ्री वाले अँटिव्हायरस वापरू शकता. आणि ज्यांच ऑनलाइन काम असतं त्यांनी विकतचे अँटिव्हायरस वापरणे गरजेचे आहे.

 कोणते आहेत ते अँटिव्हायरस- Best antivirus for android

list of antivirus
1. Avg antivirus
2.Avast antivirus
3. Avira antivirus
4. Sophos antivirus
5. Trend micro mobile security & antivirus
6. Bitdefender antivirus
7. Norton antivirus
8. Norton antivirus
9. Quick heal antivirus
10. Google play protect

फ्रीवाले अँटीव्हायरस – Free antivirus

1. Avg antivirus

AVG अँटीव्हायरस फ्री अँटिव्हायरसच्या लिस्ट मध्ये पहिल्या स्थानावर आहे. या अँटीव्हायरसची खासियत ही आहे की हे तुमच्या मोबाईल मध्ये जास्तीत जास्त मैलवेयर डिलीट करून टाकते.आणि तुमची मोबाईल मेमरी सुद्धा क्लीन करते. स्पीड सुद्धा वाढते. तुमच्या मोबाइल मधल्या बिनकामाच्या फाईल त्यासुद्धा हेअँटीव्हायरस डिलीट करतो.

एप्लीकेशन डाउनलोड लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.antivirus

2. Avast antivirus

अवास्ट अँटीव्हायरसच नाव सुद्धा तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्ही हे लॅपटॉप किंवा कम्प्यूटर मध्ये सुद्धा वापरलं असेल. फ्री अँटीव्हायरस लिस्टमध्ये हे दोन नंबरला आहे. फ्री आणि पेड ह्या दोन्हीमध्ये हे अँटीव्हायरस उपलब्ध आहे. फ्री अँटी व्हायरस मध्ये तुम्हाला फक्त स्कॅनिंग आणि मेमरी बुस्टर मिळेल. 

एप्लीकेशन डाउनलोड लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.avast.android.mobilesecurity&hl=en

3. Avira antivirus

अविरा अँटीव्हायरस हे सुद्धा काही जणांना माहीत असेल. हे तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये वापरला असेल. हे अँटिव्हायरस टॉप टेन लिस्ट मध्ये आहे. हे अँटीव्हायरस तुमच्या मोबाईल साठी खूप फायदेशीर आहे.  ह्या अँटीव्हायरसमध्ये तुम्हाला ब्लॉक आणि मेंबरी बूस्टर च बेसिक फिचर मिळेल.

एप्लीकेशन डाउनलोड लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.avira.android&hl=en

4. Sophos antivirus

हे अँटीव्हायरस काही महिन्यांपासून चांगलं सर्विस देत आहे. आणि टॉप टेन मध्ये सुद्धा ह्या अँटीव्हायरसच नाव आलं आहे. हे अँटीव्हायरस तुमच्या मोबाईल मधले मेसेज आणि मोबाइल ब्राउझिंग स्कॅनिंग करत. जर फ्री अँटिव्हायरस वापरायचा असेल तर हे ॲप सुद्धा तुम्ही वापरू शकता.

एप्लीकेशन डाउनलोड लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.sophos.smsec&hl=en

5. Trend micro mobile security & antivirus

 हे अँटीव्हायरस नवीन आहे. आणि विशेष म्हणजे चायनाच आहे. या अँटीव्हायरस मध्ये तुम्हाला ॲप लॉक आणि बूस्टर स्कॅनिंग मिळेल. त्याचबरोबर तुमची बॅटरी लाईफ सुद्धा चांगली राहील.

एप्लीकेशन डाउनलोड लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.trendmicro.tmmspersonal.apac&hl=en

विकतचे अँटीव्हायरस – Paid antivirus for android

6. Bitdefender antivirus

 हे मोबाईल अँटीव्हायरस तुमच्या अँड्रॉइड मोबाईल आणि टॅबलेट साठी सर्वात चांगलं अँटिव्हायरस आहे आणि हे पेड अँटिव्हायरस आहे.  जेव्हा तुम्ही ब्राउझर युज करत असाल तेव्हा तुम्हाला बिनकामाच्या वेबसाईट पासून सुरक्षा मिळेल. एखादी बिनकामाची वेबसाईट असेल तर ती तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होणार नाही. पेमेंट ॲप्लिकेशन वापरत असाल तर तेसुद्धा सुरक्षित राहील आणि तुमची बॅटरी लाईफ सुद्धा चांगली राहील.

7. Norton antivirus

नोर्टन मोबाइल सिक्युरिटी हे अँटीव्हायरस मोबाईल साठी आणि लॅपटॉप साठी सुद्धा उपलब्ध आहे.  जर तुम्ही  या अँटीव्हायरस ची पेड सर्विस घेत असाल तर  तुम्हाला यामध्ये वाय-फाय सिक्युरिटी सोबतच मोबाईल स्कॅनिंग, वेबसाईट प्रोटेक्शन आणि मोबाईल परफॉर्मन्स सुद्धा चांगला राहील.

8. Kaspersky antivirus

हा अँटीव्हायरस अवॉर्ड विजेता आहे.  या अँटीव्हायरस मध्ये तुम्हाला मोबाईल प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. तसेच तुम्ही एखादी ऑनलाईन ट्रांजेक्शन करत असाल तर ते सुद्धा सुरक्षित राहील. तुमचं VPN सुद्धा सुरक्षित ठेवतं. आणि तुमचा डाटा सुद्धा लिक होणार नाही.

9.Quick heal antivirus

या अँटीव्हायरस बद्दल तुम्हाला तर माहितीच असेल. हे अँटी व्हायरस मध्ये तुम्ही पेमेंटॲप पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकता. वेबसाईट पासून तुमच्या मोबाईलला धोका असल्यास त्यापासून सुद्धा हे अँटिव्हायरस तुमच्या मोबाईलला सुरक्षित ठेवेल. या अँटीव्हायरस मुळे तुमचा मोबाईलचा परफॉर्मन्स चांगला झाला असेल. ह्या अँटीव्हायरस मध्ये तुम्ही ॲप्स लॉक करून ठेवू शकता.

10. Google play protect

हे अँटीव्हायरस गुगलच आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण सुरक्षा मिळेल .एखादी थर्ड पार्टी ॲप्स असेल तर त्यापासून सुद्धा तुम्हाला या अँटीव्हायरस मध्ये सुरक्षा मिळेल. हे अँटीव्हायरस तुमच्या मोबाईल साठी एकदम बेस्ट आहे. 

ह्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला फ्री आणि पेड अँटिव्हायरस बद्दल सांगितलं आहे जर तुमचा मोबाईलचा यूज कमी असेल तर तुम्ही फ्री अँटिव्हायरस वापरू शकता. जर तुमच ऑनलाईन काम जास्त असेल तर तुम्ही पेड अँटीव्हायरस वापरू शकता.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!