Connect with us

मोबाईल

LAVA लवकरच भारतात लॉन्च करून शकतो नवीन स्मार्टफोन, माहिती झाली लिक

Published

on

LAVA Z66
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारतीय ब्रँड कंपनीचे मोबाईल बोटावर मोजण्याएवढेच आहे. तरी सुद्धा 2009 मध्ये सुरू झालेली लावा (LAVA) ही भारतीय मोबाईल कंपनी अजून सुद्धा मार्केटमध्ये टिकून आहे.

गीकबेंच च्या रिपोर्टनुसार लावा कंपनी आता नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

LAVA Z66 या मोबाईलची खासियत काय आहे थोडक्यात जाणून घेऊया

गीकबेंचच्या यादीनुसार या स्मार्टफोनमध्ये (LAVA Z66) UNISOC6 चिपसेट दिसू शकेल. युनिसोक चिपसेट असलेला हा स्मार्टफोन एंट्री लेव्हल फोन असू शकतो.

 डिव्हाइसचा सिंगल स्कोर 153 आणिमल्टी कोर टेस्ट स्कोर 809 पॉईंट आहे. याचा अर्थ असा की हे डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 625 आणि हेलियो पी 10 सारख्या प्रोसेसरसह असलेल्या डिव्हाइसच्या श्रेणीमध्ये असेल. UNISOC चिपसेटसह लॉन्च होणारा लावाचा हा पहिला स्मार्टफोन असेल.

आशा आहे की, लावा कंपनी आता एका पेक्षा एक चांगले  स्मार्टफोन काढतील. रिपोर्टनुसार हे डिव्हाइस 3 जीबी रॅमसह लॉन्च केले जाऊ शकते. 

या फोनमध्ये अँड्रॉइड 10 ओएस आउट बॉक्सची सुविधा उपलब्ध असू शकते, जी आकर्षक असेल. याशिवाय अद्याप स्मार्टफोनबद्दल इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. आशा आहे की लावा लवकरच या स्मार्टफोनशी संबंधित अन्य माहिती  लवकरात लवकर येऊ शकेल. 

या वर्षाच्या सुरूवातीला लावा (LAVA) कंपनी ने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला होता.

कंपनीने हा स्मार्टफोन 4829 रुपयांच्या किंमतीला  लॉन्च केला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा डीयू ड्रॉप आयपीएस डिस्प्लेसह 19: 9 आस्पेक्ट रेशियो आहे.

 यात एचडी रिझोल्यूशन आहे.  या LAVA Z53 मध्ये डेडिकेटेड गूगल असिस्टेंट बटन आहे. हा स्मार्टफोन 8 भाषांचा समावेश आहे. फोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेसरसह 16 जीबी स्टोरेज आहे. 

मायक्रो एसडी कार्डद्वारे स्मार्टफोनचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. यात 8 मेगापिक्सलचा रीअर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!