Connect with us

टेक बातम्या

Nokia 8.3 5G हा स्मार्टफोन झाला ई-कॉमर्स वेबसाईटवर लिस्ट

Published

on

Nokia 8.3 5G specification in marathi
Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

एचएमडी ग्लोबलने यावर्षी मार्च मध्ये Nokia 8.3 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. तसेच कंपनी लवकरच त्याची किंमत व उपलब्धता जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले.

  पण, कंपनीने अद्याप त्याच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली नाही परंतु त्याआधी हा स्मार्टफोन जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर  लिस्ट झाला आहे. यामुळे हे स्पष्ट होते की कंपनी लवकरच सगळीकडे हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Nokiamob च्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार Nokia 8.3 5G जर्मनीच्या ई-कॉमर्स साइट Amazon वर लिस्ट झाला आहे. पण माहिती नुसार या फोनची किंमत आणि उपलब्धतेचा अद्यापही माहिती नाही. फक्त   स्मार्टफोनचा फोटो लिस्ट झाला आहे.

 स्वित्झर्लंडमध्ये हा स्मार्टफोन लोकप्रिय ऑनलाइन विक्रेत्या गॅलेक्ससवर सूचीबद्ध झाला आहे. हा स्मार्टफोन 15 सप्टेंबर 2020 पासून विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे येथे नोंदविण्यात आले आहे. 

Nokia 8.3 5G या स्‍मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स | Nokia 8.3 5G specification in marathi

Model 8.3 5G
OSAndroid 10
Performance Qualcomm Snapdragon 765
Display 6.81-Inch 
Front camera 24MP
Rear camera 64MP+12MP+2MP
Ram 6GB
Storage 64GB 
Battery 4500mAh
 • या स्मार्टफोनमध्ये 6.81 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे, त्याचा स्क्रीन रेझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. आणि यात रीफ्रेश रेट 120Hz आहे. 
 • फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये Zeiss लेन्स 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर असलेले 64MP चा  प्राइमरी सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 24MP चा आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 765 जी चिपसेटसह सुसज्ज आहे.
 •  आणि दोन स्टोरेज रूपांमध्ये उपलब्ध असेल. 6GB रॅम सह 64GB स्टोरेज आणि  8GB रॅमसह 128GB स्टोरेज असेल.

Nokia 8.3 5G या स्मार्टफोनची किंमत | Nokia 8.3 5G price in india

 • Nokia 8.3 5G ची किंमत बद्दल बोलायचं जर झालं, त्याच्या बेसिक व्हेरिएंटची किंमत EUR 599 म्हणजेच सुमारे 48,000 रुपये असेल. यात 6 जीबी रॅम आणि 64 जीबी  इंटरनल स्टोरेज असेल. 
 • तर फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत EUR 649 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये असेल. हा फोन पोलर नाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.

जगभरातील लेटेस्ट Tech new आणि  Reviews सोबतच Best recharge, स्मार्टफोनवर मिळणारे  वेगवेगळे ऑफर्स  तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि हॅलोला फॉलो करा.


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!