Connect with us

टेक बातम्या

हे 52 चिनी ॲप्स भारतीयांच्या सुरक्षतेसाठी धोकादायक ठरू शकतात, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली

Published

on

Remove These 52 Chinese Virus Apps From Your Phone Now
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

भारत आणि चीनमधील सीमा विवाद कायम आहे. दोन्ही देशांमधील तणाव आता वाढलेला आहे. अशा वेळी भारताच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल उचलणे खूप गरजेचे आहे.

 हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अशी 52 अ‍ॅप्स आहेत ज्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. एजन्सींनी चीनला जोडलेले 52 मोबाईल एप्लीकेशन ब्लॉक करावे किंवा भारतीयांना हे अ‍ॅप्स वापरू नयेत, असे आवाहन सरकारला केले आहे.

एजन्सींचा असा दावा आहे की हे 52 चिनी अ‍ॅप्स वापरणे असुरक्षित आहे. हे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात भारतीयांचा डेटा देशाबाहेर पाठवत आहे. 

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चीनी डिवेलपर्स बनवलेले हे ॲप्स भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या या यादीमध्ये झूम, टिक टॉक, यूसी ब्राउझर, झेंडर, शेअर इट आणि क्लीन मास्टर सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्सचा समावेश आहे.

चिनी ॲप्स बंद करण्याचा सुरक्षा यंत्रणांच्या प्रस्तावाला राष्ट्रीय सुरक्षा परिषद  यांच्या देखील पाठिंबा आहे. या प्रस्तावावर परिषदेत चर्चा होत आहे. याॲप्समुळे भारताच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असेही परिषदेचे मत आहे. 

या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया (CERT-IN) च्या प्रस्तावावर मंत्रालयाने हा प्रस्ताव जारी केला आहे. 

सरकार आणि सुरक्षा यंत्रणांव्यतिरिक्त सोशल मीडियावर चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याची मोहीम सुरू आहे. चिनी अ‍ॅपच्या विरोधात असे वातावरण तयार होण्याची ही पहिली वेळ नसली तरी कोरोनाव्हायरसच्या काळात चिनी ॲप्सवर बंदी घालण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ते कोण कोणते 52 ॲप्स आहेत ते आपण पाहूया

  1.  TikTok
  2. Zoom
  3. Vault-Hide
  4. Vigo Video
  5. Bigo Live
  6. Weibo
  7. WeChat
  8. SHAREit
  9. UC News
  10. UC Browser
  11. BeautyPlus
  12. Xender
  13. ClubFactory
  14. Helo
  15. LIKE
  16. Kwai
  17. ROMWE
  18. SHEIN
  19. NewsDog
  20. Photo Wonder
  21. APUS Browser
  22. VivaVideo- QU Video Inc
  23. Perfect Corp
  24. CM Browser
  25. Virus Cleaner (Hi Security Lab)
  26. Mi Community
  27. DU recorder
  28. YouCam Makeup
  29. Mi Store
  30. 360 Security
  31. DU Battery Saver
  32. DU Browser
  33. DU Cleaner
  34. DU Privacy
  35. Clean Master – Cheetah
  36. CacheClear DU apps studio
  37. Baidu Translate
  38. Baidu Map
  39. Wonder Camera
  40. ES File Explorer
  41. QQ International
  42. QQ Launcher
  43. QQ Security Centre
  44. QQ Player
  45. QQ Music
  46. QQ Mail
  47. QQ NewsFeed
  48. WeSync
  49. SelfieCity
  50. Clash of Kings
  51. Mail Master
  52. Mi Video call-Xiaomi
  53. Parallel Space

जगभरातील लेटेस्ट Tech new आणि  Reviews सोबतच Best recharge, स्मार्टफोनवर मिळणारे  वेगवेगळे ऑफर्स  तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.तुम्ही आम्हाला फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि हॅलोला फॉलो करा


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र माझं नाव नितीन मी या वेबसाईटचा Admin आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल,ॲप, रिचार्ज, बेस्ट डील आणि टेक्नॉलॉजी संबंधित टिप्स अँड ट्रिक्स संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये मिळणार आहे.

Trending

error: Content is protected !!